
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
राजकीय स्थित्यंतरे, बंडखोरी महाराष्ट्राला नवीन नाही पण यावेळी गनिमीकावा या शब्दाचा मावळयांनीच काढलेला एवढा अनर्थ आजवर कधी पहिला नाही. ही रेकॉर्डब्रेक बंडखोरी नेमके कोठे जाऊन थांबणार हे काळचं ठरवेल.सत्ताधारी पक्षातील एक समूह विरोधी पक्षाशी सलगी करून सत्ता काबीज करतो.आग्रहातून महाराजांची सुटका झाल्यानंतर झाले नसेल एवढे जंगी स्वागत त्यांचे महाराष्ट्राने पाहिले. पंचतारांकित हॉटेल्स,केंद्राची सुरक्षा सारं काही पाहिलं. दुसरीकडे आरोपावर आरोपाच्या फैली, भाषेची, सभ्यतेची नवी परिसिमा लादु पाहणारे दोन्ही कडचे भक्त. कट्टरता, निष्ठा या शब्दांच्या नव्याने तयार होणाऱ्या व्याख्या.
जे घडत होतं घडवले जात होतं ते सर्व सामान्यांच्या समजण्याच्या पलीकडचे आणि तितकंच किळसवाणं होतं. मुकपणे पाहत राहण्याच्या पलीकडं आर के चा कॉमन मॅन काहीच करू शकत नव्हता. नाही म्हणायला सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडेफार वळवळ चालू होती.त्यातही मुख्यमंत्री कोण बनणार याची मीडियाला जास्त काळजी. सुत्रांच्या हवाल्याने मंत्रिमंडळ, खाते वाटप, मजबुरी, झाडी, डोंगर, दऱ्या दाखवून झाले. कोण जिंकले? कोण हारले? कोण चाणक्य कोण कटप्पा? चर्चा रंगू लागल्या पण या साऱ्या गदारोळात न्याय पालिकेच्या तटस्थ आणि संविधानिक अधिकाराचे उत्तरदायित्वाचे जे धिंडवडे निघाले ते खरं तर जास्त वेदनादायी आहे.
एका विशिष्ट विचारसरणीच्या बाजूने, संविधानिक अपवादाना नियम बनवून न्यायपालिका वागू लागली. अशी कुजबुज म्हणजे या देशाच्या अखंडतेला आणि सौरभमत्व यांना मोठा धोका आहे हे सूचित करणारा भोंगा.
हे सर्वसामान्य बोलू लागलं, उघडपणे न्याय पालिकेच्या अब्रूची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगून लागली गेली.घटनात्मक पदावरील जबाबदार व्यक्ती,आणि तटस्थ यंत्रणा दबवाखाली काम करताहेत हे मोठ्याने बोलले जाऊ लागले, पण अजून तरी हा आवाज कायदेमंडळा पर्यंत पोहचला असे वाटत नाही. हा आवाज जसा जसा क्षीण होत जाईल तशी तशी लोकशाही च्या मरणाची वेळ जवळ येत जाईल. आणि गेल्या 99:वर्षांपासून या लोकशाही ची लक्तरे तोडण्यासाठी टपून बसलेली गिधाडे तिच्या नरडीचा घोट घेतील, हे सांगण्यासाठी आता कोण्या सूत्राच्या हवाल्या ची गरज नाही.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय निघाला तेव्हा काल ऐक कार्यकर्ता म्हणाला ‘ भारतात सध्या लोकशाही आहे,
देश संविधानिक नियमानी चालतो आहे आणि हल्ली कोर्टात न्याय मिळतो ‘ या सध्याच्या मोठ्या अंधश्रद्धा आहेत.
खरंच असे आहे का?
हे आपण बदलू शकतो का?
म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकवतो आहे हे खरे दुखणे आहे.
विनयकुमार सोनवणे.
रायगड महा अनिस ज़िल्हा कार्याध्यक्ष.
8275689841