दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
अहमदपूर
दि.7/7/2022 रोजी अहमदपूर येथील सार्वजानिक जयंती मंडळाची बैठक संपन्न झाली.. साहित्यरत्न, साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बैठक घेण्यात आली त्यामध्ये सर्व अहमदपूर शहरातील विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, इत्यादींचा समावेश होता तसेच आण्णाभाऊ साठे नगर येथे बैठक घेण्यात आली यावेळी सर्व समाज व कार्यकर्ते यांच्या सर्वानुमते अध्यक्ष पदी मुकुंद भाऊ वाघमारे यांची निवड करण्यात आली यावेळी अध्यक्ष मुंकुद भाऊ वाघमारे यांचा सत्कार मा. प्रदिप भाऊ डावरे ,मा माधव समुखराव, मा रोहिदास डावरे, मा तिरुपती वाघमरे, यांच्या वतीने सत्कार करण्यात
आला व उपस्थित मान्यवर गोरोबा डावरे,शाम डावरे,अभय शिंदे, कैलास डावरे,अंकुश डावरे,दिपक कांबळे,शुभम डावरे,सुमित वाघमारे,अर्जुन डावरे ,अविनाश वाघमारे,अमित वाघमारे,कृष्णा डावरे, शाम वाघमारे,शुभम वाघमारे,सर्व समाज बांधव उपस्थित होते ,
