
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
जव्हार:- खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून सन-२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ बिगर कर्जदार शेतकऱ्यांसह कर्जदार शेतकऱ्यांनाही घेता येणार आहे.या योजनेला ३१ जुलै पर्यंत मुदत दिली असून शेतकऱ्यांना भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामातील पिकांसाठी दोन टक्के निश्चित केला आहे.या पीक विमा संरक्षित केलेल्या बाबतीत हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीत अथवा घटकामुळे पेरणी,लावणी,हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान,स्थानिक नैसर्गिक आपत्ती अशा परिस्थितीत शेतकऱ्याला या विम्याचा लाभ मिळणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेच्या कर्जखात्याशी जोडणे अनिवार्य आहे.अर्ज भरण्यासाठी बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी व शेतकऱ्यांना सुलभता यावी यासठी गावपातळीवर अधिकची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.