
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:-: भूम-परंडा-वाशी प्रा.डॉ.आ.तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी शिवसैनिक साडेसांगवी गावचे सरपंच सुभाष देवकते यांनी मुख्यमंत्र्याकडे रक्ताने पत्र लिहिले आहे.सरपंच सुभाष देवकते यांनी पत्रात असे म्हटले आहे की, भूम परंडा वाशी या मतदारसंघात विकास कामासाठी घेतलेल्या निर्णय सोबत आहे. मा.आ.तानाजी सावंत साहेब यांना महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून संधी मिळावी यासाठी मी आपणास माझ्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहीत आहे. हे पत्र मी केवळ आपल्या आ. सावंत साहेब यांच्या आपुलकी व प्रेमापोटी लिहीत आहे तरी,आपण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात साहेबांना संधी देऊन आमच्या भूम परंडा वाशी व धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सहकार्य कराल ही मला अपेक्षा आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींनी जोर धरला आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.