
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
गेल्या दहा वर्षा पासुन श्रेयाच्या लढाई मध्ये कंधार शहराच्या विकासाची वाट लागली असुन शहरातील मुख्यरस्त्याची दैनिय आवस्था झाली आहे.या मुख्यरस्त्यावर महाराणा प्रताप चौकापासुन गांधी चौका पर्यत मोठ मोठाली खड्डे पडल्यामुळे नागरीकाना व वाहाण धारकाना पायी चालणे आवघड झाले आहे तर वाहाण धारकाना वाहान चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे आपण कंधार शहरातील मुख्यरस्त्याकडे उघडा डोळे बघा निट काय आवस्था शहरातील रस्त्याने जनतेची केली आहे .याकडे लक्ष देवुन तात्काळ मुख्यरस्ता दुरुस्त करावा अशी जनतेची मागणी आहे.
कंधार शहरातील जनतेनी व मतदार संघातील जनतेने ज्या आपेक्षेने नगर सेवका पासुन ते खासदार आमदार याना शहराचा व तालुक्याचा विकास होयील म्हणुन निवडुन दिले पण या लोकप्रतिनिधीने जनतेचा अपेक्षा भंग केला आहे. लोकप्रतिनिधीचा दिवसेन दिवस विकास होत आहे पण शहराच्या विकासाला दिवसेन दिवस खिळ बसत आहे. लोकप्रतिनिधीच्या श्रेयाच्या लढाईत वैभवशाली असलेल्या कंधार शहराला लोकप्रतिनिधीची दृष्ट लाघली काय असेच म्हनावे लागत आहे. गेल्या दहा वर्षा पासुन शहर विकासापासुन कोसोदुर आहे. लोकप्रतिनिधी आपल्या सोयीचे राजकारण करीत असल्यामुळे या सोयीच्या राजकारणात जनतेचे हाल होत आहेत शहरातील मुख्यरस्त्यावर किती दिवस खड्डे बुजवित राहाणार असा प्रश्न जनतेतुन केला जात आहे.निवडुन दिलेले लोकप्रतिनिधी फक्त वाढदिवसाला, लग्णाला आवर्जुन हजरी लावतात यातच त्यांना त्यांचा विकास दिसत आहे. कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते गांधी चौका पर्यंत या मुख्य रस्त्यावर जवळपास पाच पाच फुटाचे दहा दहा फुटाचे लांबी रुंदीचे खड्डे पडले आहेत त्या पाणी साचल्यामुळे वाहाण धारकाना वाहाण चालवताना त्याचा अंदाच कळत नसल्याने अपघात होत आहेत या रस्त्यावरुन वयोवृध्द नागरीकाना चालणे आवघड झाले आहे. कंधार शहराच्या विकासात मुख्यमंञ्यानीच हस्तक्षेप करुन शहराचा विकास करावा अशी मागणी कंधार शहरातील जनतेतुन केल्या जात आहे. कंधार शहरात ऐतिहासिक वास्तु आहेत त्यात कंधार येतील भुईकोट किल्ला, बडी दर्गाह, संत साधु महाराचा मठ आसल्यामुळे राज्यातील पर राज्यातील नागरीक दर्शनासाठी आणि भुईकोट किल्ला पाहाण्या साठी दररोज शेकड्यानी पर्यटक येत आसतात पण शळरातील अरुंद रस्ते आणि खड्डेमय रस्ते असल्याने वाहाण चालवताना जिवावरची कसरत करावी लागत आहे. शहराच्या आजुबाजुला व शहरात धरण आसतानाही दोन तिन दिवसा आड पाणी मिळत आहे. त्याच बरोबर कंधार तालुक्यातील रस्त्याची दैनिय आवस्था झाली आहे. कंधार ते बारुळ मार्ग नर्सी, कंधार ते पांगरा ,कंधार ते घोडज मार्ग माळाकोळी , हे रस्ते गेल्या विस वर्षापासुन खड्डे बुजविण्या शिवाय मजबुतीकरण होत नाही त्यामुळे राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंञी एकनाथ शिंदे साहेबानी अधिकचे लक्ष देवुन कंधार शहरातील व तालुक्यातील मजबुत रस्ते तात्काळ करुन द्यावेत अशी मागणी शहरातील जनतेतुन होत आहे