
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
आपल्या डोंगर-दर्यांच्या मन्याड खोर्यात रस्त्याचे जाळे विणले गेले.ही गोष्ट अभिमानाची आहेच पण..सध्या सर्वत्र मा.नितीन गडकरी यांच्या कल्पकतेतून द्रुतगती महामार्ग नांदेड ते बीदर उत्तम पध्दतीने काम सुरु आहे.मानसपुरी येथील महादेव मंदिर ते जंगमवाडी पुल हा रस्ता द्रुतगती महामार्ग आहे पण या रस्त्याचे भिजत घोंगडे पडल्यामुळे वाहनधारका॔ना जीव मुठीत धरून, प्राण तळहातावर घेऊन प्रवास करावा लागतो आहे.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा वेशीवर मोठ्या मारोती मंदिरापुढे चक्क मिनी जगतुंग सागराची निर्मितीची झाल्यामुळेच हा रस्ता “मौत का सौदागर”बनला आहे.अनेक जनांनी यासाठी अर्जबाजारही केला.पण प्रशासन ध्रृतराष्ट्राच्या भुमिकेत कुंभकर्णी झोप घेत आहे.अनेक राजकीय नेते या खडतर रस्त्यावरुन मुग गिळून मुकाट्याने ये-जा करत करत आहे.पण कुणाचीही प्रशासकीय दरबारी जिबली सुध्दा हलवत नाहीत.सध्या भिज पाऊस पडत असल्यामुळेच या रस्त्यावर “खड्यात रस्ता का रस्त्यात खडा”अशी दयनीय अवस्था झाली आहे.या पाणी साचलेल्या खड्या पासून मन्याड नदीचा पुल संपे पर्यंत रस्ता हा अपघाताचे क्षेत्र म्हणून अनेक दिवसांपासून कुण्या प्रवाशाला कुण्या वाहानला गिळंकृत करण्यासाठी अगदी सज्ज वाटतो आहे.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा, ता.कंधार येथील जागरुक नागरीक या नात्याने मला हे सर्व पाहून आश्चर्य वाटले….अन् माझी लेखनी आपसूकच शब्द कागदावर उमटवू लागली.एवढेच काय मोठ्या मारुतीरायाचे दर्शन घेणारे सद्भक्त या पाण्यातून जातांना डोंबांऱ्याच्या खेळातील कसरत करुन जातांना वाहन येताच त्यांच्या अंगावर त्या डबक्यातले घाण पाणी अंगावर उडताच त्यांचा पोषाख धुळवडीच्या सणागत चिखलाने माखला जातो आहे.ही शोकांतिकाच वाटते आहे.लगेच शांतीघाट विश्राम गृहाच्या प्रवेश व्दारा पासून पुर पार करे पर्यंत जिवघेणा प्रवास करावा लागतो आहे.त्या पुलाचे सुरक्षा कठडे तुटल्याने पुलाव वरील रस्ता खड्डेमय झाल्यामुळेच पादचारी नागरीकांना व शेतकरी राजांना ये-जा करतांना डोकेदुखी बनला आहे.एवढेच काय बहाद्दरपुरा नगरीचे चीरशांतीधाम शांतीघाटावर असल्यामुळेच अंत्यसंस्कारासाठी प्रेतयात्रा या रस्त्यावरून जातांना तर विसवा सोडतांना या नादुरुस्त सडकेचा खुप त्रास नातेवाईक व शव तिरडीवर नेणाऱ्या खांदेकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.ही शोकांतिकाच खुप कांही सांगुन जाते.एखाद्या प्राण केल्यानंतर रस्ता दुरुस्त होईलही पण गेलेला जीव परत कांही करता येणार नाही.याकडे गांभीर्याने प्रशासन व ठेकेदार यांनी भविष्यातली अडचणी परिस्थिती ओळखूण त्वरीत कार्यवाही करुन रस्याची परिस्थिती सुधारुन मानवता धर्म जपावे ही विनंती.
स्वतंत्र भारताचे प्रथम माजी पंतप्रधान शांतीदुत पंडित जवाहरलाल नेहरु यांची राख या मन्याडीच्या प्रवाहात प्रवाहित केल्यामुळेच हा प्रश्न कुणालाही शांतीचा मार्ग सांगतो आहे.या लोअर मानार प्रकल्पाच्या जलाशयास माजी पंतप्रधान राजीवजी गांधी नाव दिल्यामुळे या गंभीर परिस्थिती कडे प्रशासन जाणुन-बुजुन पुतणा मावशीचे प्रेम दाखवत आहे.द्रुतगती महामार्गाच्या ठेकेदारांना विनंती आहे की,कुणाचा जीव जाण्याची वाट न पाहता त्वरीत या सडकेच्या दयनीय अवस्थेकडे पाहून वेळीच दुरुस्त करुन जनतेस याच्या तावडीतून सोडवावे ही आर्तकिंकाळी जनता-जनार्धना कडून ऐकू येत आहे.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार