वारीमय ..
मृदुंगाच्या तालावर
एक ठेका एक लय
पंढरीला चाले वारी
वातावरण भक्तिमय
नाही थारा वेदनेला
झराझरा चाले पाय
ओढ लागे दर्शनाची
बोलाविते विठू माय
जात पात सान थोर
विसरुनि सारे जाय
देशवेश अभिनिवेश
बोलेकुणी असेकाय
एकपंक्ती संगेबसती
घासघास सारे खाय
पांघरुण आभाळाचे
अंथरूण भुमि आय
सांभाळते विठू माय
दुधावरची जणूं साय
जपून यावे वासरांनो
हंबरते गोठ्या गाय
विठ्ठल रूप पाहता
रडू फुटले धाय धाय
जीव शीव भेट होता
स्वर्ग सुख दुजे काय
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996
www.kavyakusum.com
2
सेवेकरी ..
आहे साधा सेवेकरी
वस्तीला मी मंदिरात
हरकाम्या म्हणे मला
काम करतो दिनरात
झाड लोट सडा घाले
सफाई ती परिसरात
पहाटे काकडआरती
शब्द घुमले अंतरात
सांभाळे चप्पलजोडे
भक्त राही येत जात
सेवा घडते अनाहूत
विसरून ते धर्मजात
पुजेसाठी चंदन उटी
बसतो रोज उगाळत
होतात हात सुगंधित
सुवास येई नकळत
भक्तापुढे वाके नित्य
प्रसाद वाढे पंगतीत
वारक-या सेवा करी
संत्संग घडे संगतीत
भजन किर्तन स्तोत्रे
घुमत राहती कानात
पाठ झाला हरिपाठ
विठ्ठल ठसला मनात
निर्माल्य उचलायाला
बोलावले गाभा-यात
दर्शन सुख काय वर्णू
स्वर्गामधे पिढयासात
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
www.kavyakusum.com
