दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कोरपना तालूका – प्रदिप मडावी
कोरपणा तालुक्यातील इरई ते कवठाळा ६ किलोमीटर मेन रोड ची अवस्था अक्षरशाह चाळणी सारखी अवस्था झाली असून खड्डे इतके झाले आहेत की रोड शोधणे अवघड झाले आहे. खड्यात पाणी साचल्या मुळे पायी चालणाऱ्या माणसांना सुद्धा अवघड झाले आहे.
या रोड ला दररोज खुप वर्दळ असते. या मध्ये टुव्हीलर थ्रीव्हीलर, फोरव्हीलर,बैलबंडी इत्यादी वाहनांची गर्दी असते परंतु चार चाकी वाहनास चालवनाऱ्याना तर तारेवरची कसरत केल्या जाणवत असेल कारणकी खड्डे भरपूर झाल्यामुळे कोणचा खड्डा चुकवावा हे समजण्यास अवघड बनले असून रोड मुळे खुप दुर्घटना होत असून.या कडे गट ग्रामपंचायत भारोसा प्रशासन कधी लक्ष देणार आहे का? अशा प्रश्न इरई येथील युवा कार्यकर्ते निखिल पिदूरकर करीत आहे.
