दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-तालुक्यातील आंबी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार अभिमान डुकळे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली. यानिमित्त त्यांचा आंबी पोलीस स्टेशन वतीने कार्यरत अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.राज्य पोलीस महासंचालक मुंबई यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी यांना पदोन्नती दिली. तर आंबे पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या एकमेव पोलीस संबंधात यांनाही पदोन्नती मिळाली आहे.तर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस ठाणे आंबी येथील पोलीस अधिकारी सर्व कर्मचारी उपस्थित होते.
