
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी -माणिक सूर्यवंशी
खानापूर :बऱ्याच दिवसाच्या पावसाच्या प्रतिक्षेत नंतर वरूण राजाने अक्षरशा धो धो बरसत अचानक मुसंडी घेत दोन दिवसात जिकडे तिकडे पाणीच पाणी करून टाकले.याचा भाग म्हणून मन्याड नदी लगत असलेल्या मौजे वझरगा येथील गावा लगत शेतामध्ये बाजूच्या नाल्यातील पाणी आल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे पिकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. जमीन खचून गेलेली आहे. दुबार पेरणीचे संकटाचे घाव सोसून होता नव्हता ते पैसा घालून केलेली पेरणी पाण्याने वाहुन गेली. पहिलं कोरड्याने मारलं आता ओल्यानं… असं म्हणायची पाळी आता वझरगा येथील शेतकऱ्यावर आली त्यांची पाण्यात वाहून गेलेली पीक पाहून अक्षरशः पाण्याने डोळ्यात पाणी आणायला लावलं. शासन याकडे लक्ष देऊन सदरील वाहून गेलेल्या पिकांची पाहणी करून त्यांना योग्य न्याय देईल काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शासन दरबारी याची नोंद घेऊन सर्व नदीच्या किनारी झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई शासनाने करून द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.