
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी -मानिक सुर्यवंशी .
देगलूर: देगलूर तालुक्यामध्ये सतत दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावल्यामुळे लख्खा गावात जाणारा मुख्य रस्तावरुन पाणी जात असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. गावच्या मुख्य रस्त्यावरील पुल खाली असल्याने पुलावरून पाणी जात आहे.सकाळी शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना पाण्यातुन गावामध्ये जाता येत नव्हते तेव्हा त्या प्रसंगी देगलूर पोलीस निरीक्षक सोहन माछरे सर, मोरे सर यावेळी उपस्थित राहून तेथील परिस्थिती पाहून रेस्क्यू टीमला बोलावून घेतले मग रेस्क्यू टीमने शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याच्या पलीकडे पोहोचण्यास खूप मोठे यश आले.व संपूर्ण गावकरी व विद्यार्थ्यांचे पालक यांनी रेस्क्यू टीमचे व पोलीस दलाचे आभार मानले.ग्रामस्थानकडुन नविन पुलाची मागणी होत आहे.स्थानिक आमदार व प्रशासनाने याकडे लक्ष देवून प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.अशी मागणी ग्रामस्थांनकडुन मागणी होत आहे.