
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
परंडा:- तालुक्यातील उंडेगाव येथील अरविंद शेरे यांच्या घरपोडी प्रकरणी आरोपी त्यांचाच मुलगा निघाला असून आंबी पोलीसांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन आरोपींना अटक करून चोरलेली रक्कम जप्त करण्यात आली,अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर यांनी दिली आहे.परंडा तालुक्यातील उंडेगाव येथील अरविंद शेरे यांची घरपोडी करून अज्ञात चोराने रोख रक्कम चोरली होती याप्रकरणी आंबी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता याप्रकरणी चोरीचा तपास पोलीसांनी सुरू केला.याप्रकरणी सुनील अरविंद शेरे व प्रवीण भक्तीदास शेरे या दोघांनी गाव परिसरात यापूर्वी अनेक वेळा चोरी केल्याने त्यांना आंबी पोलिसांनी अटक केली होती.त्या दोघा आरोपींची दुसऱ्या गुन्ह्यात उस्मानाबादच्या कारागृहात रवानगी केली होती.
दोघा आरोपींची कारागृहात रवानगी करण्यापूर्वी उंडेगाव येथील अरविंद शेरे यांची घरपोडी झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्या गुन्ह्यातील तपासाचे चक्र आंबी पोलीसांनी फिरवतात हा गुन्हा उघडकीस आला.याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी भुम यांच्या मार्गदर्शनाखाली आंबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर पोना. एस.पी शिंदे. पोकॉ. सतीश राऊत,पोकॉ.सोनटक्के,यांच्या पथकाने
तपास केला असता उंडेगाव येथील अरविंद शेरे यांची घरफोडी त्यांचा मुलगा सुनील शेरे यांने प्रविण शेरे याच्या मदतीने घरफोडी करुन चोरी केल्याची खात्री पटल्याने आंबी पोलिसांनी दोन्ही आरोपींना उस्मानाबाद च्या कारागृहातुन ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी चोरी केल्याचे कबुल केले,तर या घटनेचा पुढील तपास पोना.शिंदे हे करीत आहेत.