
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
मुंबई.दि.९.ओबीसी आरक्षण रद्द झाले असून त्याबाबत विधिमंडळाने ओबीसी आरक्षण बाबत त्याशिवाय निवडणुका घेतल्या जात होत्या याबाबत ओबीसी आदिवासी समाजाचे नेते
राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना पत्र लिहून ओबीसी समाज बांधवाना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत ओबीसी आरक्षण शिवाय नगरपालिका निवडणुका घेवू नयेत अशी मागणी केली.त्यात विधी मंडळाने त्याबाबत ठराव केला आहे. त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे.
अचानक आलेल्या निवडणुका त्यात पावसाचे आगमन झाले असून अनेक वेळा नुकसान झाले आहेत.त्यात अश्या प्रकारे निर्णय घेणे चुकीचे असून सरकारने ओबीसी आरक्षण जनगणना करण्याची चालढकल चालवली आहे.
सदर बाबतीत बातमी काल व आज दैनिक चालू वार्ता वृत्तप्रत्राने प्रकाशित केली होती. ती बातमी सोशल मीडिया वर वायरल झाली आहे.
याबाबत नवनिर्वाचित मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे हे लक्ष घालणार असून निवडणूक आयोगास निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते.