
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
शहरासह तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सततधार होत असलेल्या जोरदार पावसाने येथील शेकडो एकर काळी शेतजमिनी खरडून गेले असल्याचे विदारक चित्र संपूर्ण तालुक्यात दिसून येतआहे.त्यांतच काही ठिकाणी हा पाऊस वरदान सुद्धा ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.तालुक्यात तीन जुलै रोजी झालेल्या रात्रीच्या मुसळधार पावसाने किनवट शहरातील काठावरील शेतजमिनीत पुराचे पाणी थेट शेतात घुसल्यामुळे कोब फुटलेल्या बी भरलेल्या पिकासह प्रचंड पाणी शेतात झाल्याने अनेकांच्या शेतातील कट्टे देखील फुटल्यामुळे अनेकांच्या शेतातील काळीमाती वाहून गेली या पावसाने खरीप पिकांचे सुद्धा प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्यांची मोठी हानी झालीआहे.याकडे किनवट माहुर मतदारसंघातील विधानसभेचे आमदार भिमराव केरामसह,हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी पुढील पावसाळीअधिवेशनात हा विषय तांराकींत करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई अनुदान मंजूर करून घ्यावे,असे शेकडो शेतकरी बांधवांकडून मागणी सतत होतआहे. किनवट तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून दिवसारात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने कापूस,तुर,सोयाबीन व इतर पिकांचे बियाणे वाहुन गेल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केल्यानंतर एक जुलै पासून दररोज जोरदार, रिमझिम पावसाने तालुक्यात हजेरी लावल्यामुळे येथील काही शेतकरी समाधान सुद्धा व्यक्त करीत आहेत.अशातच तीन जुलै रोजी झालेल्या धुव्वाधार जोरधार पावसाने तालुक्यातील नदीकाठा वरील शेतजमिनी खरडून गेल्याचे येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे,शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे बांध फुटून त्यांचे प्रचंड नुकसान सुद्धा झाले असल्याचे बांधावरुन दिसते.नुकतेच पेरणी केलेले बी कोब फुटलेले पीक जमीनदोस्त झाले,असल्याचे सुधा काही ठिकाणी दिसून येतआहे. त्यामुळे स्थानिक महसूल प्रशासनाचे तलाठी व मंडळाधिकारी किनवट,बोंधडी,जलधरा,शिवणी इस्लापूर, वर्तुळ मंडळामधिल शेतीचे पंचनामे करून शासन दरबारी त्याचे अहवाल पाठून शेतकऱ्यांना मदत मिळून द्यावी अशी एकमुखी मागणीआमदार भिमराव केरामसह खासदार हेमंत पाटील हिंगोली महोदयांकडे होत आहे.