दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
अहमदपूर – मानखेड-सोनखेड-पाटोदा ता.अहमदपूरच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक दि.10 जुलै रोजी पार पडली. या निवडणुकीमध्ये भाजपा प्रणित पॅनलनचे उमेदवार सर्वच्या सर्व म्हणजेच 13 जागा मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले.
भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते मा.शिवाजीराव भिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक लढली गेली.या निवडणुकीत 1)खराबे शिवशंकर गुरुलिंग 2)करपूडे बाबु भानुदास 3) केंद्रे भाऊसाहेब वामनराव 4)खाडे रामदास ञ्यंबक 5)पवार गुणवंत दादाराव 6) जाधव कालिदास रामराव 7)नारागुडे श्रिकांत गंगाराम 8) केंद्रे तुकाराम सदाशिव हे कर्जदार गटातुन निवडुन आले आहेत तर महिला गटातुन नारागुडे जनाबाई आणि रोडगे पद्मीनबाई नागनाथ हे निवडुन आले आहेत.
यापुर्वीच अनुसुचित जाती गटातुन कांबळे नानासाहेब रामजी आणि ईतर मागासवर्गीय गटातुन भिकाने नागेश विश्वनाथ हे बिनविरोध निवडुन आले होते.
भटक्या विमुक्त गटातुन ढाकणे विश्वनाथ जयवंतराव हे निवडुन आले आहेत.
यावेळी निवडुन आलेल्या सर्व संचालकांचे पॅनलप्रमुख तथा मार्गदर्शक शिवाजीराव भिकाने साहेबांनी अभिनंदन केले आहे.
