दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
लोहा – कंधार तालुक्यातील मानसपुरी येथील महारुद्र प्राथमिक शाळेत शिक्षक घेत असलेला इयत्ता ६ वी वर्गातला विद्यार्थी स्वराज्य माणिकराव डांगे यांची नवोदय विद्यालयात शिक्षणासाठी निवड झाली असुन सदरील विद्यार्थ्यांने जवाहरलाल नवोदय परीक्षेत नांदेड जिल्हातुन दुसरा तर अंधार तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जवाहरलाल नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्वराज्य माणिकराव डांगे यांनी ह्या यशाचे खरे शिल्पकार शाळेतील सर्व शिक्षकवृंद व माझे आई-वडील असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली असुन त्यांना घरातील सर्व आई वडील काका काकु व परीसरातील मिञ परीवाराने परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सत्कार व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
लोहा येथील डांगे ऑनलाईन सेंटरचे संचालक सचिन डांगे यांनी पण परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल शुभेच्छा देऊन सत्कार केला व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठ शुभेच्छा दिल्या.
