
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दिलीप नगर :– रेणा सहकारी साखर कारखान्याकडून चालू गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये गळीत झालेल्या ऊसाच्या एफआरपी पोटी तिस-या हप्त्याची अंतिम रक्कम रू. ३०० प्रमाणे रेणा कारखान्याचे संस्थापक व मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री आ.अमित विलासरावजी देशमुख,रेणाचे संचालक तथा आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी जाहीर केले आहे.
गळीत हंगाम २०२१-२०२२ साठी रेणा कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात ऊसाची नोंद झाली होती. अतिरिक्त ऊसाची मोठी समस्या उदभवलेली असताना देखील रेणा साखर कारखान्याने माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री आ.अमित विलासरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब व संचालक सुचनेनुसार व नियोजनातून संचालक मंडळ व सर्व अधिकारी कर्मचारी, ऊसतोड कामगार, वाहतूकदार यांच्या सहकार्याने सर्व ऊसाचे गाळप केले आहे.
रेणा साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील एफआरपी पोटी पहिला हप्ता प्रती मे. टना प्रमाणे रू. २२००(बावीसशे) दुसरा हप्ता २००(दोनशे) व तिसरा अंतिम हप्ता रू. ३०० अशा प्रकारे एकूण २७००/-(दोन हजार सातशे) एवढी रक्कम अदा केली आहे.
यानुसार यापुर्वी २४००रू. प्रति मेट्रिक टन प्रमाणे १५३ कोटी,२८ लाख रक्कम अदा केली आहे. व आज ३००रू.प्र.में.टना प्रमाणे १९ कोटी,१५ लाख एवढी रक्कम बँकेत वर्ग केली जात आहे. यानुसार चालू गळीत हंगामात एकूण १७२ कोटी ४४ लाख एवढी एकूण रक्कम ऊस पुरवठादार शेतक-यांना रेणा कारखान्या कडून अदा केली गेली आहे.
रेणा कारखान्या कडून रू. ३०० चा अंतिम दर जमा केल्या बद्दल ऊस उत्पादक शेतक-याकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
३०० रू.(तीनशे)प्रती मे. टन प्रमाणे होणारी रक्कम तत्परतेने संबंधित शेतक-यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येत असल्याची माहीती रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे यांनी दिली आहे.