
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कलंबर सर्कल- हनुमंत श्रीरामे
लोहा: सर्व विद्यार्थी व प्राचार्य तसेच समन्वयक एम.ए व एम.कॉम बहिस्थ अभ्यासक्रमातील सर्वांना कळविण्यात येते की दिनांक 13 जुलै 2022 पासून सुरू होणारी बहिस्थ पदव्युत्तर एम ए व एम कॉम अभ्यासक्रमाची उन्हाळी 2022 परीक्षा अतिवृष्टी व पूर सदृश्य परिस्थितीमुळे पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून सदर परीक्षा दिनांक 18 जुलै 2022 पासून पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार व संबंधित परीक्षा केंद्रावर घेतल्या जातील.याची नोंद घ्यावी.व सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना निदर्शनास आणून द्यावे.दिनांक 18 जुलै 2022 पासून सुरू होणाऱ्या परीक्षेचे अद्यावत वेळापत्रक लवकरच विद्यापीठ संकेतस्थळावर प्रकाशित केले जाईल याची नोंद घ्यावी.