
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा – मागील चार ते पाच दिवसांपासून चालु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असुन या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा व सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सतिशभाऊ आनेराव यांनी केली आहे.
सततच्या पावसामुळे तालुक्यात अतिवृष्टी निर्माण झाल्यामुळे महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्यांना गती देण्याची गरज आहे. अतिवृष्टीने पुरामुळे नुकसान झालेल्या घरांची शेतीचे नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्यास तात्काळ सुरूवात करावी व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये तातडीने मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सचिनभाऊ आनेराव यांनी केली आहे.