
दैनिक चालु वार्ता पारनेर प्रतिनिधी-विजय उंडे
जाधववाडी ता. पारनेर:- येथे जिल्हा परिषद अहमदनगर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जलजीवन मिशन अंतर्गत गावांतर्गत नळ पाणीपुरवठा करणे – २८ लक्ष रुपये कामाचा शुभारंभ राज्याच्या विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना विजय औटी म्हणाले जाधववाडीचे दरडोई उत्पन्न चांगले आहे,या गावाला सामाजिक वळण आहे, जाधववाडी व राऊतवाडी मध्ये सामाजिक शहाणपण आहे. येथील लोकांचे माझे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत,शेती हा आपला उपजत व्यवसाय आहे. जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळ योजना होणार असल्याने पुढील काळात सर्व वस्त्यांना घरपोच नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या योजनेचा या गावाला नक्कीच लाभ होईल. समाजकारण व राजकारणात फार जपून वागावे लागते.आपण कधीकधी राजकारणात मोठी चूक करून ठेवतो व त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागते म्हणून आपल्याला आलेला न्यूनगंड, आपणास आलेला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे व योग्य निर्णय घेतला पाहिजे.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले,जिल्हा पाणी व स्वच्छता समितीच्या अध्यक्ष हे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात व जिल्हा परिषदेचे ग्रामीण पुरवठा कार्यकारी अभियंता त्या समितीचे सचिव असतात.माझ्या जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या कार्यकाळात जाधव वाडी व राऊतवाडी करिता जवळपास ७० लक्ष रुपयांचा निधी दिलेला आहे.या पुढील काळातही येथील राहिलेले प्रश्न आपण मार्गी लावू असेही आश्वासन सभापती दाते यांनी दिले.
यावेळी जिल्हा शिवसेना उपप्रमुख रामदास भोसले माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव नगरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
*[नदीला ओढ असते सागराची! चकोराला ओढ असते चंद्राची! चातक पक्षाला ओढ असते पावसाची! आम्हा सर्व शिवसैनिकांना ओढ आहे विजयराव औटी साहेबांची! परिस्थिती ही नेहमी बदलणारी असते घाबरायचे कारण नाही. झाडावरचे पक्षी किडा मुंग्यांना खातात परंतु मेल्यानंतर हेच किडे मुंगी पक्षांना खातात, पारनेर तालुक्यातील दुसरा विकास पुरुष म्हणजे सभापती काशिनाथ दाते सर, ही शब्द पाळणारी माणसे आहेत: सरपंच विठ्ठल सेठ जाधव]*
यावेळी उपसरपंच उषा जाधव, ग्राम. सदस्य वैभव जाधव, राणी सोमवंशी, अक्षय सोमवंशी, ओंकार जाधव, बाबुराव गुंजाळ, बंन्शी जाधव, अमित जाधव, संतोष जाधव, यशवंत जाधव, किरण जाधव, बबन जाधव, जय जाधव, सुशांत जाधव, शिवाजी जाधव, राजाराम जाधव, रावसाहेब जाधव, मच्छिंद्र जाधव, सिताराम जाधव, पोपट सोमवंशी, भिमाजी जाधव, बबन जाधव, प्रकाश बेलोटे, संतोष जाधव ,स्वप्निल जाधव, श्रीधर जाधव, पंढरी जाधव, शांताराम जाधव, काका जाधव, बाळू जाधव, गणेश सोमवंशी, यशवंत जाधव, राजू सोमवंशी, नामदेव जाधव, धीरज जाधव, अविनाश जाधव, वसंत जाधव, साहेबराव जाधव कामाचे ठेकेदार अशोक वाळुंज इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरपंच उद्योजक विठ्ठल शेठ जाधव यांनी केले तर आभार उपसरपंच उषा जाधव यांनी मानले.