
दैनिक चालू वार्ता परतूर/प्रतिनिधी
परतूर :येणोरा येथील अंगणवाडी परिसर अस्वच्छ होउन गटाराचे स्वरूप आले आहे, त्याचा बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे .मुलांना शाळेत जाण्याच्या मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत . त्यात रस्त्याच्या कडेला असलेला जमिनीलगत आड आहे त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे . गावातील 40_ 50 मुली बाहेर गावी शाळेत जातात मुलींना बस्ट्यांड वरती थांबण्यासाठी सुरक्षित जागा नाही . त्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने १ अंगणवीडी समोरील गटार दुरुस्त करून मुलांना जान्यायोग्य रस्ता करून देण्यात यावा
२ विठ्ठल मंदीरा समोरील मुख्य रस्त्याच्या नालीवर जाळी बसवण्यात यावी
3 बाहेरगावी शाळेत जाणार्या मुलींसाठी स्वतंत्र बस थांबा बाधुन देण्यात यावा
4 सार्वजनिक जागेवरील व रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे.
इत्यादी मागण्यासाठी दिनांक 18/7/2022 रोजी ग्रांम पंच्यायत कार्यालय येणोरा येथे धरणेआंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदक बाल संरक्षण समिति तथा तहसीलदार यांना दिले आहे. या निवेदनावर प्रज्ञानंद भास्कर साळवे ,विजय अंशिराम भुंबर, दत्ता गायकवाड ,संतोष भुंबर,सतीश भुंबर,दिलीप भुंबर, डीगांबर भुंबर,भागवत भुंबर,अशोक भुंबर, रंगनाथ काळे,गोविंद गायकवाड,पांडुरंग भुंबर,लक्ष्मण भुंबर,डीगांबर शिवाजी भुंबर,ज्ञानोबा भुंबर,तुकाराम भुंबर, साहेबराव भुंबर, दत्तात्रय शिंदे, आर्जून भुंबर, बाजीराव भुंबर,विनू गायकवाड, वैभव , राजेश भुंबर , भास्कर साळवे आदींच्या सह्या आहेत .