
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी- गोविंद पवार
तालुक्यातील मौजे खेडकरवाडी येथील रहिवाशी तथा लोहा शहरातील सराफा व्यावसायिक असलेले वैजनाथ खेडकर यांचे मागील कांहीं महिन्यांपूर्वी हदय विकाराने निधन झाले होते. त्यांनी बँक ऑफ इंडीया शाखेत गुंतवणूक करून त्यावर विमा कवच उतरविला होता. त्यावर विमा कंपनीकडून विमा रक्कम मंजूर होवून त्यांच्या कुटुंबातील वारसास धनादेश वितरीत करण्यात आला.
सराफा व्यावसायिक असलेले वैजनाथ आनंदराव खेडकर यांनी कांहीं कालावधी पूर्वी १० लाख ३१ हजार रुपयांचे वाहन बँक कर्जातून घेतले होते. खेडकर यांची व्यवसायाच्या आर्थिक व्यवहार निमित्ताने बँकेत सतत ये जा असायची त्यातून तत्कालीन बँक शाखाधिकारी श्रीकांत गुर्लेवाड यांनी खेडकर यांना भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा मौलिक सल्ला दिला. त्यानुसार खेडकर यांनी बँक ऑफ इंडीया शाखेत गुंतवणूक केली. त्यावर स्टार युनियन कंपनीकडून विमा उतरविण्यात आला होता. दरम्यान खेडकर यांचा हादय विकाराने खेडकर यांचा मृत्यू झाला. बँकेचे वरिष्ठ प्रबंधक श्रीकांत गुर्लेवाड यांनी सातत्याने पाठपुरावा करून खेडकर कुटुंबातील वारसास विमा रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. दि. १४ रोजी मयत खेडकर यांची पत्नी श्रीमती कविता खेडकर व मुलगी वैष्णवी खेडकर यांना विमा रकमेचा धनादेश बँक ऑफ इंडिया चे नांदेड येथील वरिष्ठ प्रबंधक श्रीकांत गुर्लेवाड, लोहा शाखेचे शाखाधिकारी विनोद मस्के, खरेदी विक्री संघाचे श्याम पाटील पवार, एम. एस. चारी, ज्ञानोबा पाटील पवार, गंगाधर सूर्यवंशी, उमेश बेजगमवार, पत्रकार बापू गायखर, प्रदीपकुमार कांबळे, शेतीनिष्ठ शेतकरी विठ्ठलराव शिंदे, विमा कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी सुमित कदम, विमा प्रतिनिधी नीळकंठ वाघमारे, सहाय्यक आकाश परमार आदीं प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत विमा रक्कम १९ लाख ३५ हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. खेडकर यांच्या मोटार वाहनाचे १० लाख ३१ हजाराचे कर्ज माफ झाले.