
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी- गोविंद पवार
येथून जवळच असलेल्या व लोहा पोलिस ठाणे हद्दी अंतर्गत असलेल्या चिखलभोसी येथील सेवा सहकारी सोसायटीची मुदत संपुष्टात आल्याने सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये सर्वानुमते ठरवून सोसायटी बिनविरोध काढण्यात आली. त्यामध्ये चेअरमनपदी काशिराम वरपडे तर संभाजी किडे यांची व्हॉईस चेअरमनपदी नाही निवड करण्यात आली.
चिखलभोसी ता. कंधार येथील प्रतिष्ठेची समजली जाणारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. तशी तयारी देखील दोन्ही पॅनल कडून करण्यात आली मात्र ऐनवेळी एका पॅनल ने माघार घेतल्यामुळे सदरील निवडणूक ही बिनविरोध काढण्यात आली. त्यामध्ये काशिराम वरपडे यांची चेअरमनपदी तर संभाजी किडे यांची व्हॉईस चेअरमनपदी निवड करण्यात आली. तर नव्याने निवड झालेले संचालक मंडळ असे – यशवंत किडे, गजानन वरपडे, तिरुपती वरपडे, व्यंकटी रंडाळे, व्यंकटी सोनकांबळे, घनश्याम किडे, कमलबाई किडे, सुमनबाई किडे, आनंदराव केशे, भीमराव असेगावे आदींची निवड झाली.
सदर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक कोकणे तर सहाय्यक म्हणून उत्तमराव जोंधळे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी गावचे सरपंच जयवंत किडे, पांडूरंग सोनकांबळे, प्रभाकर किडे, माधव भोसीकर, माजी सरपंच भगवान वरपडे, बद्रीनाथ वरपडे आदी प्रमुखांनी परिश्रम घेतले.
निवड झालेल्या चेअरमन, व्हॉईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत सत्कार केला. यावेळी रावसाहेब वरपडे, संभाजी किडे, भीमराव वरपडे, शालेय समितीचे अध्यक्ष माणिक वरपडे, गजानन वरपडे, अरुण पाटील, माजी सरपंच नारायण वरपडे, तिरुपती तेलंगे, त्र्यंबक वरपडे आदींसह बहुसंख्येने उपस्थिती होती.