
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी – आकाश माने
जेव्हा सरकार अल्पमतात असते तेव्हा कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही. शेवटच्या कॅबिनेटमध्ये २०० निर्णय घेतले आहेत. हे निर्णय बेकायदेशीर आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. उद्या आम्ही कॅबिनेट घेऊन आम्ही हे निर्णय रद्द करणार आहे, कारण या निर्णयाला उद्या कोणी चॅलेंज करु शकतो. त्यामुळे हे निर्णय बेकायदेशीर ठरू शकले असते.
आम्ही संभाजीनगर या नावाला स्टे दिलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून निघालेल्या शब्दाला आम्ही स्टे दिलेला नाही. तुम्ही कितीही खोट बोला ते पटणार नाही, आणि उद्या पुन्हा नामांतराबाबत अधिकृत घोषणा करू असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.