
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना गाढेसावरगाव घनसावंगी रस्त्यावरील कुंडलिका नदीवर सुरु असलेल्या नवीन पुलाच्या कामाला शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांनी भेट देऊन पाहणी केली. त्वरित हार्ड मूरुम डब्बर टाकून रस्त्याचा भराव करावा व प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशा सूचना संबंधित खात्याचे अधिकारी व गुत्तेदाराला सुचना दिल्या. एजन्सीने काम पूर्ण होईल याकडे लक्ष घालावे असे आदेश अर्जुन खोतकर यांनी दिले. या रस्त्यावर घनसावंगी व जालना तालुक्यात जवळपास १०० गावाचा संपर्कअसून दरवर्षी या पुलावर पुराच्या पाण्यामुळे प्रवाशांची व वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेऊन आपण सतत या पुलाचे काम व्हावे म्हणून शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करत राहीलो व हे काम व्हावे म्हणून प्रयत्नशील होतो अखेर या कार्याला यश आले व आज प्रत्यक्ष या कामाला सुरुवात झालेली आहे. अल्प काळात हे काम दर्जेदारपणे पूर्ण होऊन जनतेची अडचण दुर होईल. याचा आपणास मनस्वी आनंद आहे असे अर्जुन खोतकर यांनी सांगितले. यावेळी संतोष मोहिते, उदयराज तनपुरे, उदयभानु तरनपुरे, लक्ष्मण उंबरे, दत्ता काळे यांच्यासह रोहणवाडी, लोंढेवाडी व सारवाडी येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.