
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी-दत्तात्रय वा. कराळे
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवारी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठीचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण करता यावे, समाजातील पीडित महिलांना होणा-या अन्यायाचे निवारण सुलभपणे करता यावे यासाठी हे आयोजन करण्यात येत असते.
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या तिस-या सोमवारी तर तालुका स्तरावर चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येते.
जिल्हास्तरावरील आयोजित लोकशाही दिनाच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी तर तालुका स्तरावर तहसीलदार हे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
माहे जुलै २०२२ महिन्याच्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. १८ रोजी सकाळी ठिक ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिले आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक पीडित महिलांनी आपल्या हक्काचे संरक्षण व्हावे व न्याय मिळावा यासाठी जिल्हास्तरीय महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी श्री. तिडके यांनी केले आहे.