
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे गेल्या दोन वर्षाच्या कोरोना महामारी नंतर पहिल्यांदाच दानापा महाराजांचा भंडारा काल्याचे किर्तन व सोंगी भारुडाने साजरा करण्यात आला . शनिवार दिनांक 15 रोजी सायंकाळी जागरासाठी महाप्रसाद व अन्नदानाची शेवा सालाबाद प्रमाणे राहुल होनराव यांची झाली व रात्री 8 ते 10 या वेळेत ह भ प रामभाऊ शेळके महाराज यांचे जागराची कीर्तन होऊन. दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 16 रोजी सकाळी 7 वाजता संपूर्ण गावामध्ये टाळ आणि मृदुंगाच्या आवाजात भाविक भक्त ज्ञानबा तुकाराम,, ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करीत गाव दिंडी प्रदक्षिणा केली. कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडकेदादा निवासा समोरील प्रांगणामध्ये पालखी व दिंडी सोहळ्याचा विसावा करून. या ठिकाणी भारुड सम्राट ह भ प सावता केशव फुले सणसर तालुका इंदापूर यांची भारुड सेवा करण्यात आली.
गाव दिंडी प्रदक्षिणा व सोंगी भारुड, नामाच्या जयघोशात भाविकांच्या फुगड्या झाल्या नंतर लगेचच टाळ आणि मृदंगाच्या आवाजात दिंडी सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मध्ये दाखल होऊन भजनी मंडळ व भाविक भक्त यांच्या उपस्थितीत काल्याचे किर्तन ह भ प रामभाऊ शेळके महाराज यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.
प्राथमिक शाळा पिंपरी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या लहान विद्यार्थ्यांनी देखील दिंडी सोहळ्यामध्ये भाग घेऊन आनंद व्यक्त केला.
पिंपरी बुद्रुक गावचा दाणापा महाराजांचा भंडारा संपूर्ण भागामध्ये प्रसिद्धी आसल्यामुळे नरसिंहपूर, गिरवी, टणु, गोंदी, ओझरे, सराटी, अकलूज, बावडा गणेशवाडी आडोबा वस्ती, चव्हाण वस्ती, शिंदे वस्ती, या सर्व भागातील सर्व भजनी मंडळ व गायक भक्त आणि ग्रामस्थ महिला वर्ग इत्यादी उपस्थित होते.
तसेच पिंपरी बुद्रुक येथील भजनी मंडळ व वारकरी सांप्रदायिक आजी-माजी सरपंच आजी-माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष विविध संस्थांचे आजी-माजी चेअरमन आणि सर्व ग्रामस्थ व महिला भगिनी या सोहळ्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी काल्याचा महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.