
दैनिक चालु वार्ता वडेपूरी प्रतिनिधि-मारोती कदम
वडगावची शाळा ग्रामीण भागातील सुंदर व उपक्रमशील शाळा….मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर /घुगे मॕडम यांचे गौरवोद्गार…..
– वडगाव येथील जि.प.प्रा.शाळेस नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर / घुगे मॕडम व शिक्षणाधिकारी मा.प्रशांत दिग्रसकरसर यांनी अकस्मित भेट देवून शाळेची पाहाणी करुन डिजीटल लॕब चा सविस्तर आढावा घेतला…शिक्षकांनी याचा नियमित वापर करावा व शाळेच्या गुणवत्तेत वाढ करावी असेही त्या म्हणाल्या . याच सोबत मुलींच्या उपस्थिती व गळती बाबत सविस्तर अभिलेखे पाहून शाळेतील इतर उपक्रमाचेही कौतूक केले….ग्रामीण भागातील एक सुंदर व उपक्रमशील शाळेबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रविण पाटील सर व सर्व शिक्षकांचे कौतुक केले…..यावेळी गावचे सरपंच प्रतिनीधी मा.विनायक पा.काळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.बालाजी पा.कल्याणकर, तंटामुक्ती अध्यक्ष मा.शंकरराव काळे ,चेअरमन माधवराव पा.भवर केंद्रप्रमुख टी.पी.पाटील सर यांनी सौ.वर्षा ठाकूर यांचा व शिक्षणाधिकारी साहेबांचा शाल व पुष्पगुच्छा देवून सत्कार करण्यात आला…तर शाळेच्या वतीने ज्ञानदीप हे पुस्तक मान्यवरांना भेट देण्यात आले.
यावेळी मारतळा केंद्राचे केंद्र प्रमुख मा.पाटील टी.पी.सर , शाळेचे मु.अ.पाटील सर व पवार सर,शिक्षक उपस्थित होते.यावेळी राजमाता जिजाऊ ग्राम विकास कृतीदलाचे सचीव मा.विकी भवर व अनेक शिक्षण प्रेमी नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात ठाकूर मॅडमचे मुख्याध्यापक प्रवीण पाटील सर व शिक्षक मंडळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंच यांनी येथेचित सन्मान केला.वर्षाताई ठाकूर ह्या शालेय परिसर स्वच्छता शिस्त पाहून आनंदीत झाल्या.प्रत्येक खेड्यापाड्यात अशा शिक्षकांची गरज आहे.खरोखरच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रवीण पाटील सर यांनी स्वतः ज्ञानदीप पुस्तक लिहिले आहे त्यामध्ये विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक आचारसंहिता तर आहेच, पण विद्यार्थी संस्कार कसे असावेत ह्याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे खरच प्रवीण पाटील सरांसारखे अष्टपैलु शिक्षक वृंद असतील तर शाळा नावारूपाला यायला वेळ लागत नाही. प्रविण पाटील सर व वडगाव येथील शिक्षक वृंद यांनी केलेली मेहनत आज फळाला आली आहे.सगळ्या वडगाव नगरीत शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे.पालक वर्ग मुख्याध्यापक पाटील सर व शिक्षक वृंद यांचे कौतुक करत आहेत…