
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
मुसळधार पावसाचा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे.याच पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री आणि प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी अचलपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
अमरावती :- अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे.काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.याचा शेतकऱ्यांच्या पिकालाही मोठा फटका बसला आहे.अनेकांची जमीन खरवडून गेली आहे तर काही ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलं आहे.या मुसळधार पावसाचा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे.याच पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री आणि संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी अचलपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.यावेळी त्यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार नंतर करा,आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी केली आहे.