
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- शहरातील नामांकित विधिज्ञ प्रदीप प्रल्हाद मोटे यांची एस.बी.आय बँक शाखा भूम येथे कायदा सल्लागार पदी नियुक्ती झाल्यामुळे त्याचे भारतीय जनता पार्टीच्यावतीने त्याचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
सोमवार दि. १८ जुलै २०२२ रोजी भुम शहरातील नामांकित विधिज्ञ प्रदीप प्रल्हाद मोटे यांची एस.बी.आय बँक शाखा भूम येथे कायदा सल्लागार पदी नियुक्ती झाली, यामुळे त्याचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आदम शेख, ता. सरचिटणीस संतोष सुपेकर , शहर अध्यक्ष शंकर खामकर, अल्पसंख्याक ता. अध्यक्ष महेबूब शेख,उदयोग आघाडी ता. अध्यक्ष रमेश बगाडे, अ.जा.शहर अध्यक्ष प्रदीप साठे, तालुका चिटणीस हेमंत देशमुख माजी नगराध्यक्ष संभाजी साठे,बाप्पा बोराडेसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते .