
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मा.विभागीय आयुक्त औरंगाबाद संभाजीनगर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली, निवेदनात पुढे म्हटले आहे की,मुळात ही तक्रार राजकीय नाही, म्हणून मा.जिल्हाधिकारी जालना यांनी पाटोदा (माव) गावाची प्रत्यक्षात पाहणी करावी,कारण जालना जिल्ह्यातील तालुका परतुर येथील पाटोदा (माव) ग्रामपंचायत बरखास्त करून, सरपंचाने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, कारण राज्य सरकार व केंद्र सरकार लाखो रुपयाचा निधी ग्रामपंचायतीच्या विकासासाठी उपलब्ध करून खर्च करण्यासाठी देत आहे, परंतु पाटोदा गावातील लोकांना कुठली सुविधा उपलब्ध नाही, तसेच १८ ते २० महिन्यापासून या ग्रामपंचायतने गावातील नाल्या बांधकाम झालेले नाही, उपसा केलेला नाही म्हणून गावात व अस्वच्छता आहे, गावाची लोकसंख्या जवळपास ४५०० आहे, ग्रामपंचायत सदस्य संख्या ९ आहे, सरपंच पद सर्वसाधारण महिला आहे, गावगाड्यातील ५ सदस्य एका गटाचे तर ४ एक गटाचे आहेत, महिला सरपंच असल्यामुळे महिलेचे पती हे सुद्धा सदस्य आहेत, महिला सरपंचाचा संपूर्ण कारभार त्यांचे पती बघतात प्रत्येक कागदपत्रावरती महिला सरपंचाच्या पतीच्या स्वाक्षऱ्या आहेत, याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे, खासबाब म्हणजे या गावात अद्याप कोणत्याही विषयावर ग्रामसभा झालेली नाही, ग्रामसभा झाली ती फक्त कागदोपत्री, या ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेतली असेल तर त्यांनी एखादा फोटो अथवा व्हिडिओ दाखवावा अशी आमची मागणी आहे,या गावात तीन अंगणवाड्या आहेत तीन अंगणवाड्यापैकी दोन वस्तीत आहेत,या एका अंगणवाडीच्या बाजूला घाण कचरा टाकून उकंडा निर्माण केलेला आहे, यामुळे एका अंगणवाडी चे बांधकाम पूर्ण झाले नाही परंतु बिल उचलून घेतले असा मागणी करुन आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे…