
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
चारच खासदार ठाकरेंसोबत-
दरम्यान, शिंदे गटातील आमदारांची मुंबईत बैठक सुरू असून या बैठकीला जवळपास 14 खासदार ऑनलाईन सहभागी असल्याचे समजते. गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत आणि राजन विचारे वगळून इतर सर्व खासदार शिंदे गटात सामील झाल्याची सूत्रांची माहिती त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदारांपाठोपाठ खासदारही गेल्यास शिवसेना ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाल्यानंतर शिवसेनेसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे
शिंदे गटाच्या बैठकीत चौदा खासदारांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. हे खासदार शिंदे गटात सहभागी झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, आमदारांपाठोपाठ आता खासदारांनाही फोडण्यासाठी दिल्लीतून कुटील डाव रचला जात असल्याची कबुलीच खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
शिवसेना फोडण्याचे षडयंत्र दिल्लीतून रचले जात असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊतांनी हे आरोप केले आहेत. प्रत्येकाच्या कारवायांबाबत आमच्याकडे माहिती आहे. कोण कुठे जातो, कोण कुणाला भेटतो हे माहिती आहे. काही जणांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिली आहेत. आमचा नाईलाज आहे, आम्हाला ओढलं जातंय. आमच्यावर दबाव आहे, असं या खासदारांचं म्हणणं आहे. काहींनी मेसेज पाठवले आहेत, असं राऊतांनी सांगितलं.
खासदारांवर चौकशीचा, ईडीचा, आयटीचा दबाव टाकले जात आहेत, हे सत्य आहे. पन्नास खोके तर आमदारांपर्यंत चालले होते. तर खासदारांसाठी आणकी दहा खोक्यांचा भाव वाढल्याचे कानावर आले आहे. खासदारांना अमिष दाखवले जात आहे. सर्व खासदारांना आम्ही व्हीप बजावलेला आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, त्यामुळे कुणावरही आजतरी संशय नाही, असंही राऊत म्हणाले.
संसदेच्या अधिवेशनात कट शिजतोय, अशा बातम्या ऐकायला येत आहेत. काही खासदारांशी चर्चा झाली आहे. आजही तीन खासदारांशी चर्चा झाली. कोणत्या ना कोणत्या छोट्या मुद्यावर पकडायचं आणि दबाव टाकायचा, हे दुर्दैवी आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेत फुट पाडायची आणि उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याचा कुटील डाव आहे. काही जण त्याला दुर्दैवाने बळी पडतात, असं राऊतांनी स्पष्ट केलं.