
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मंचर : शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असून त्यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
आता खऱ्या अर्थाने सत्तेत आलो आहे. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे.
तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर आढळराव पाटील यांनी समाज माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले होते. त्यावेळी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र काही वेळेतच नजरचुकीने हा प्रकार झाल्याचे सांगून शिवसेनेने कारवाई मागे घेतली होती. तेव्हापासून आढळराव पाटील नाराज होते. ते शिवसेनेत थांबणार की शिंदे गटात जाणार याबाबत चर्चा सुरू झाली होती.