
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : कोथरूड भागातील रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्ड्यांच्या निषेधार्थ रस्त्यांवरील खड्डयांभोवती रांगोळी काढून त्या डबक्यांमध्ये कागदी होड्या सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोथरूड शाखेकडून काल अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्डे तातडीने न बुजविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
शहरात गेल्या आठ दिवसात झालेल्या जोरदार पावसाने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पाऊस, रस्त्यांवरील खड्डे यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच कोथरूड परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले. कोथरूड विभाग प्रमुख सुधीर धावडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्य आंदोलनात विभाग सचिव राजेंद्र वेडे पाटील, शहर संघटक शैलेश जोशी, उपविभाग अध्यक्ष रमेश उभे, सचिन विप्र, गणेश शिंदे, पांडुरंग सुतार, शाखा अध्यक्ष विराज डाकवे,किरण उभे, शुभम गुजर, किरण जोशी, ज्ञानेश्वर काकडे यावेळी उपस्थित होते.