
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी -प्रदिप मडावी
कोरपना
कोरपना तेलंगाणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची वसाहत चर्चेत असून या वसाहती मध्ये नियमित सेवा देणाऱ्या डॉक्टर सह आरोग्य कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहे.पण याच वसाहतीमधील काही घरामध्ये ४ ते ५ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कब्जा केल्याची माहिती समोर येत आहे. कोरपना तालुक्यात असलेल्या ४० ते ४५ गावातील जनतेच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय आहे.या रुग्णालयात नियमित आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व कर्मचारी आहे.सोबतच काही कंत्राटी कर्मचारी सुध्दा कार्यरत आहे. आरोग्य सेवा असल्याने डॉक्टर सह कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे असा नियम आहे.याकरीता रुग्णालयालागत वसाहत बांधण्यात आली आहे.सध्या या वसाहतीमध्ये नियमित सेवा देणारा ‘स्टॉप’ वास्तव्यास आहे.पण काही घरामध्ये ४ ते ५ कंत्राटी कर्मचारी रहात असल्याची माहिती आहे. मुळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय वसाहती मधील घर राहण्यास मिळत नाही. असे असतांना सुध्दा या कर्मचाऱ्यांनी वसाहतीमधील काही घराचा ताबा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.या कर्मचाऱ्यांना वसाहती कुणी आसरा दिला असा प्रश्न निर्माण होत आहे.