
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
अहमदपूर:-विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत पॅनल प्रमुख म्हणून नाथराव केंद्रे मा. ता. अध्यक्ष भाजपा व विद्यमान चेअरमन सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार यांचा दणदणीत विजय साजरा केला.
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गंगाहिप्परगा- रुद्धा-बेंबडेवाडी च्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगाहिप्परगा येथे मतदान प्रक्रिया पार पडली तर पाच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पॅनल प्रमुख सुभाष कदम, खोबराजी केंद्रे, दत्ता सुरनर, दादाराव होळंबे, देवकते बाबूराव,फाजगे व्यंकट, बेंबडे उद्धव, सुरकुटे महेश, स्वामी विश्वनाथ, केंद्रे आशाबाई, मंदवाड केवळबाई, सुरकुटे व्यंकट, कोमले लक्ष्मण या विजयी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली.
विजयी उमेदवारांची गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली गुलालाची उधळण करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तर किंगमेकर च्या भूमिकेत माजी सरपंच नाथराव केंद्रे ठरले.
यावेळी सिद्धू मासुळे,चंद्रकांत चामवड, प्रकाश देवकते,संगम काडवडे , सुरेश काडवडे, संतोष कदम, आर.बी. कदम, प्रताप फाजगे, भगवान भालेराव, पिंटू सुरकुटे, सुरेश बेंबडे, बालाजी स केंद्रे, राजेंद्र केंद्रे, संभाजी केंद्रे, भास्कर केंद्रे, गुंडेराव केंद्रे, नारायण केंद्रे,अच्युत सुरणर, दशरथ केंद्रे,वसंत सुरणर,मारोती सुरणर,सतीश केंद्रे तसेच गंगाहिप्परगा- रुद्धा-बेंबडेवाडी गावातील मतदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व विजयी उमेदवाराचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.