दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
चाकूर दि १९
थोर समाजसुधारक,परिवर्तनवादी विचारांचे क्रांतिकारक, वास्तववादी जीवन आपल्या साहित्यातून मांडणारे साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध ठिकाणी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
लक्ष्मीनगर,साठे नगर,जुने बसस्थानक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कार्यकर्ते व समाज बांधवाकडून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी धनराज सुर्यवंशी,राम कसबे,संतराम मोठेराव,दिवाकर मोठेराव,सुभाष मोठेराव,पवन मोठेराव,विजय मोठेराव,राम मोठेराव,श्याम मोठेराव,बालाजी वाघमारे,दत्ता वाघमारे,अभिषेक मोठेराव,संग्राम मोठेराव,सुहास मोठेराव आदी कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
