वैजापूर (प्रतिनिधी) / अरविंद पवार
वैजापूर तालुक्यातील साकेगाव येथील प्राध्यापक डॉ. सिताराम कचरू मोगल यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगरच्या वतीने मानव्य विद्याशाखेअंतर्गत समाजशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे. बुधवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी विद्यापीठाने त्यांच्या या संशोधनावर अधिकृत मोहोर उमटवली.
डॉ. सिताराम मोगल यांनी “औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण बालकामगारांचा समाजशास्त्रीय अभ्यास” या विषयावर आपला संशोधन प्रबंध सादर केला होता. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना डॉ. प्रतिभा अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.
आपल्या प्रबंधाच्या माध्यमातून डॉ. सिताराम मोगल यांनी छ. संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबणाऱ्या बालकामगारांच्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि विशेषतः आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास केला आहे.
बालकामगार ही समाजाला लागलेली कीड असून, तिचे निर्मूलन करण्यासाठी त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून सरकारला महत्त्वपूर्ण शिफारसी सादर केल्या आहेत. त्यांच्या या अभ्यासपूर्ण प्रबंधाचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कौतुक होत आहे.
डॉ. सिताराम मोगल यांच्या या यशाबद्दल त्यांचे मार्गदर्शक, वर्गशिक्षक डॉ. सुनील गायकवाड, असुदे सर, जाधव सर, शेलार सर, प्रा. रमेश आव्हाळे तसेच जि.प. सदस्य मा. श्री. रामहरी बापू जाधव यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच त्यांचे वर्गमित्र संतोष मोगल, अमोल जाधव, राजकुमार ठुबे, सुयोग चुडिवाल, अरुण निकम, अशोक आव्हाळे, उमेश रोठे, गणेश बोर्डे, संजय जाधव, योगेश घोटे, विठ्ठल आव्हाळे, मनीषा थोरात, सुवर्णा बारसे, दीपाली गोरे, प्रतिभा बोरसे, बापूराव मोगल, संजय बोर्डे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
याशिवाय साकेगाव येथील ग्रामस्थांनीही त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. एका ग्रामीण भागातील युवकाने घेतलेली ही झेप वैजापूर तालुक्यासाठी भूषणावह ठरली आहे.
