प्रतिनिधी : स्वाती हडकर
तांबी–तांबडवाडी–रावळगाव–निर्व्हाळ या महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करणे तसेच रस्त्याचे नूतनीकरण व्हावे, यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या मागणीसाठी श्री. प्रकाशराव जाधव, श्री. शशिकांत चव्हाण, श्री. मोहन जाधव तसेच दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न केले.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व माजी मंत्री आमदार भास्करराव जाधव यांनी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या रस्त्यासाठी सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.
त्यामुळे या भागातील नागरिकांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निधीमुळे तांबी–तांबडवाडी–रावळगाव–निर्व्हाळ या मार्गाचे नूतनीकरण होऊन वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे.
स्थानिक विकासाला चालना मिळण्यासोबतच ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी होणार आहेत.
दरम्यान, या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक श्री. शशिकांत चव्हाण यांनी आमदार भास्करराव जाधव यांचे आभार मानले तसेच त्यांचे अभिनंदन केले.
दोन्ही गावांतील ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त करत पुढील काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
