
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
डॉ.सुनील पावरा आर्थोपेडिक सर्जन सिव्हिल हॉस्पिटल व शासकीय मेडिकल कॉलेज नंदुरबार येथे असिस्टंट प्रोफेसर असलेले डॉ.पावरा यांची फेलोशिप जॉईंट रिप्लेसमेंट दिल्ली येथे एका वर्षासाठी निवड झाल्याने आदिवासी कर्मचाऱ्यां कडून डॉ. पावरा यांच्या राहत्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.जाईंट रिप्लेसमेंट निवडी मुळे मुंबई, पुणे,नाशिक,सुरत येथे होणारी शस्त्रक्रिया नंदुरबार येथे लवकरच शक्य होईल.यावेळी पावरा समाज उन्नती मंडळाचे प्रा.सरदार पावरा, प्रवीण पावरा,राकेश मोरे,कांतीलाल पावरा,दिलीप पावरा,विजय पावरा,अनिल पावरा, दानसिंग पावरा,सुभाष पावरा आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया –
जाईंट रिप्लेसमेंट निवडी मुळे मुंबई, पुणे,नाशिक,सुरत येथे होणारी शस्त्रक्रिया नंदुरबार येथे शक्य लवकरच होईल शिवाय आदिवासी पट्ट्यातील जनता सिकलसेलमुळे जॉईंट ची वाढती समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. — डॉ.सुनील पावरा —
अशिक्षित आई वडिलांची जिद्दी, डॉ.मुलगा गावकऱ्यांचा प्रेरणास्थान …
डॉ.पावरा हे यांचे धडगाव तालुक्यातील उमराणी बु या छोटयाच्या खेड्यातील असून त्यांचे आई वडील अशिक्षित असून ही शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन हाल अपेष्टा सहन करत तिन्ही मुलांना शिकवले त्यात थोरला सुनील हा आर्थोपेडिक डॉ.असून त्यांची दोन्ही भाऊ शेवटच्या वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण घेत असून आज डॉ.सुनील पावरा यांचे आदर्श ठेवत उमराणी गावातील दरवर्षी सामान्य कुटूंबातील चार ते पाच मुले वैद्यकीय शिक्षणासाठी जिद्दी,चिकाटी मेहनती च्या जोरावर जात असल्याने उमराणी गाव आधुनिकीकडे जात असल्याने गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.