
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनीधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक दृष्ट्या नावाजलेले पीपल्स महाविद्यालय नांदेड येथील समाजशास्त्र विषयाचे प्रा. चंद्रकांत उत्तमराव गजभारे यांनी समाजशास्त्र विषयात संशोधन कार्य पूर्ण केल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड च्या वतीने समाजशास्त्र विषयातील संशोधनासाठी त्यांना पीएचडी प्रदान केली.
त्यांनी त्यांचे संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी प्रा.डॉ. कृष्णा शेंडे यांचे मार्गदर्शन घेतले तसेच सह मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. संदीप गोरे – योगानंद स्वामी महाविद्यालय वसमत यांचेही मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एम.जाधव तसेच कॉलेजचे उपप्राचार्य डॉ ए. एन. सिद्धेवाड , उपप्राचार्य डॉ. सचिन पवार , समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्वाती काटे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सहकारी बंधू व कार्यालयीन कर्मचारी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा.डॉ. चंद्रकांत उत्तमराव गजभारे यांचे अभिनंदन केले.
त्यांच्या या अभुतपुर्व यशामुळे नांदेड व नांदेड परिसरात त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला जात असून सर्वत्र कौतुक सुद्धा होत आहे.