
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
ए.एस. क्लबच्या करोडी ते लासूर स्टेशन पर्यंत मुंबई/नागपूर हा राज्य महामार्ग खड्ड्यामुळे बनतोय मृत्यूचा सापळा…..
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची पायी दिंड्या व वाहनाची वर्दळ वाढल्याने अनेक भाविकानही सोसाव्या लागत आहे खड्ड्यामुळे मरणयातना….
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील मुंबई/नागपूर महामार्गवरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सावंगी चौकात असलेल्या खड्ड्यात पाण्याचे तळे साचले असून यामुळे अपघाताला निमंत्रण देत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून होत आहे.
दरम्यान ए.एस. क्लब ते लासूर स्टेशन पर्यंत हा राज्य महामार्ग म्हणजे खड्ड्यात रस्ता कीं रस्त्यात खड्डे हेच कळत नसून दररोज यां रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघात होते असून आत्तापर्यंत अनेक निष्पाप जिवांचा बळी यां खड्ड्यानी घेतला आहे सोमवारी पोळ रांजणगाव येथे असणाऱ्या खड्ड्यात एक मालट्रक पलटी झाला होता मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवित हाणी झाली नाही मात्र यां रस्त्यावरील खड्ड्यात सध्या पाणी साचलेले असल्याने खड्ड्याच्या अंदाज प्रवाशांना येत नाही त्यामुळे दुचाकी स्वार या खड्ड्यात जाऊन पडल्याने जखमी होऊन शारीरिक वेदना सहन कराव्या लागत आहे.
प्रतिक्रिया :-अन्वर शेख (प्रवाशी, लासूर स्टेशन)माझा व्यवसाय असल्याने माझे कायम औरंगाबादला येणे जाणे असते मात्र मुंबई नागपूर महामार्गांवर करोडी ते लासूर स्टेशन पर्यंत अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यात असणाऱ्या यां खड्ड्यात पाणी साचते त्यामुळे प्रवाश्याना यां खड्ड्याचा अंदाज येत नाही व त्यामुळे अनेक अपघात दररोज होत आहे पोळ रांजणगाव येथे असलेल्या खड्ड्यात तर अनेक दुचाकीवरील महिला पडल्या असून जखमी झाल्या आहेत किमान आत्तातरी यां रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणीही अन्वर शेख यानी केली आहे.
रवींद्र पाटील चव्हाण (उपसरपंच,धामोरी )राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाला ए एस क्लब ते लासुर स्टेशन दरम्यानच्या रस्त्यावर झालेले खड्ड्याच्या बाबतीत काल सोमवारी माझ्यासाह संजय पांडव,अमोल जाधव (भाजयुमो), अशोक सौदागर यांनी भेट देऊन खड्डे बुजवण्याची मागणी केली होती अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली असून आ.प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्याने सदर रस्त्याचे दोन लेयर मजबुती करणाचे काम पावसाळा संपल्याबरोबर सुरू होणार आहे.