
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि – जब्बार मुलाणी
तब्बल दोन वेळा उद्घाटन होऊनही मदनवाङी गावातील प्रमुख रस्ता जैसे त्या स्थितीत
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यमार्ग 54 मदनवाडी-पोंधवडी-अकोले- बागवाडी -शेळगाव- निमसाखर प्रजिमा 99 या रस्त्याचे काम
मदनवाडी ते पोंधवडी (किलोमीटर 00/00 ते 5/00 तालुका इंदापूर जिल्हा पुणे) या हद्दीमध्ये वरील रस्त्याचे काम सुरू होऊन खूप दिवस झाले परंतू अद्याप प्रमुख रस्त्याचे काम सुरू करण्यात आलं नाही
वास्तविक पाहता संबंधित रस्ता हा मदनवाडी मधून सुरू होत असून या रस्त्याच्या भूमिपूजनाचा समारंभ
मदनवाडीमध्ये तत्कालीन राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या उपस्थिती दोन वेळा घेण्यात आला गावातील सर्व प्रमुख नेतेमंडळी या उद्घाटना समारंभासाठी उपस्थित होते 2 कोणशीला या उद्घाटन समारंभाच्या लावण्यात आल्या परंतु कामाला काय मुहूर्त सापडला नसेल तर याला जबाबदार कोण
काही नेतेमंडळींच्या शांत बसण्यामुळे ठेकेदार व प्रशासन जाणीवपूर्वक मदनवाडी गावातील काम सुरू करत नसतील तर ही मदनवाडीकरांसाठी अपमानास्पद बाब आहे
गावातील सर्वसामान्य जनतेसाठी जर प्रमुख रस्ताच हा धोकादायक आहे या रस्त्याने अनेक शाळेतील लहान मुलं जात असतात कितीतरी वेळा गाड्या घसरून पडतात किती जणांना दुखापती झाल्यात तरी जर या संदर्भात बोलण्यास कोणच तयार नाही