
दैनिक चालू वार्ता सातारा प्रतिनिधी -संभाजी गोसावी
सातारा जिल्हा पोलीस दलांमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सुकन्या सौ. वृषाली अशोक देसाई या गेले काही वर्षापासून सातारा जिल्हा पोलीस दलातील शिरवळ पोलीस ठाण्यांत मध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत. एक आई आपल्या दोन मुलींना सोडून ऑन ड्युटी अहोरात्र कर्तव्य बजावत आपल्या जिवाची बाजी लावत आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौ. वृषाली अशोक देसाई यांचा अधिक खाकी मंग बाकी या उक्तीला अनुसरुन खाकी वर्दीतील स्त्री शक्तीने बजावलेले आपले कर्तव्य! खरंच पोलीस दलाची प्रतिमा उंचवणारी आहे कोरोनांच्या कठीण काळामध्ये आपल्या जीवाची परवा न करता आपल्या दोन लहान मुलींना न भेटता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले सातारा जिल्ह्यांतील शिरवळ पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या वृषाली अशोक देसाई यांनी सगळ्या कठीण असणाऱ्या चेक पोस्टवर आपले कर्तव्य बजवले या कर्तव्यासाठी तत्कालीन सातारा जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देवुन त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते. कोरोनांच्या काळात सुमारे ६ महिने सकाळपासून रात्रीपर्यंत आपला जीव धोक्यांत घालून लॉक डाऊनची आपली ड्युटी पुणे सातारा बॉर्डरवर सातारा हद्दीतील प्रवेशांत आपले कर्तव्य बजावले वृषाली देसाई यांना मात्र हे शब्द नक्कीच आठवत असतील. इतनी शक्ती हमे दे ना, दाता मन का विश्वास कमजोर होणा, या काळात त्यांनी आपल्या मुलींना वेळ देऊ शकले नाहीत कुटुंबाच्या संपर्क हा फक्त दूरध्वनीवरुनच त्यांनी ठेवला होता. सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी गोसावी यांनी सुद्धा कोरोना काळामध्ये त्यांनी केलेली कामगिरी पाहून सौ. वृषाली देसाई मॅडम यांची शिरवळ पोलीस ठाण्यांमध्ये सदिंच्छा भेट घेत भव्य स्वागत केले होते. पोलीस तसेच भारतीय सेना यांचे कर्तव्य आणि त्यांची कामगिरी जगासमोर मांडणे हे आमचे कर्तव्यच आहे असे आपले मत पत्रकार संभाजी गोसावी यांनी व्यक्त केले.