दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी- गोविंद पवार
लोहा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व नांदेड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आनंदराव बोंडारकर यांच्या सुचनेनुसार शिवसेना पक्षात सतत कार्यरत असणारे गजानन माधवराव पवार यांची किसानसेना उपजिल्हाप्रमुखपदी तर संदिप मेघाजी पवार यांची लोहा शहर संघटकपदी निवड करण्यात आली.
येणाऱ्या काळात पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक व पक्षवाढीसाठी व जिल्हाभरात भगवा झंझावात ठेण्यासाऊ सदरील निवड करण्यात आली असुन या निवडीचे नियुक्ती पञ देताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कऱ्हाळे शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश पा हिलाल शिवसेना लोहा कंधार विधानसभा संघटक मिंलीद पा पवार , किसान सेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पा क्षीरसागर, गजानन गुंठे , आदिंची उपस्थिती होती.
