
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
आपल्या पदस्थापना व आवश्यक मागण्यां पदरात पाडून घेण्यासाठी चंद्रपूरातील शेकडों कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांनी काल सोमवार दि.१८जूलै पासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालया समोर आपले काम आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असल्याचे या संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यांने आज या प्रतिनिधीस एका भेटी दरम्यान सांगितले. दरम्यान त्यांनी आपल्या एकूण सहा मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना एक निवेदन( या पूर्वीच )सादर केले आहे .परंतू अद्याप त्यांच्या या मागण्यांबाबत शासनस्तरावर विचार विनिमय झाला नाही.त्यामुळे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी संघटना गट “अ “(B.A.M.S.)जिल्हा चंद्रपूर यांना काम बंद आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला .DMRE BONDED MBBS वैद्यकीय अधिकारी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पदस्थापना न देता ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय , जिल्हा रुग्णालय येथे पदस्थापना देण्यात यावी , कार्यमुक्त करण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी यांना पूर्वीच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात यावी,कोविड काळात राज्य सरकारने कोरोना योध्दा करीता विशेष कोविड भत्ता लागू केला तो अद्यापही देण्यात आला नाही तो देण्यांत यावा आदीं मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती बघता तातडीने या कडे लक्ष पूरवून त्यांचे हे आंदोलन मिटवावे असे सर्व स्तरावरुन बोलल्या जात आहे.दरम्यान त्यांचे आंदोलनाला अनेकांनी भेटी दिल्या असल्याचे समजते .