
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर शहरातील बावडावेस येथील माळी गल्ली वार्ड क्रमांक १० मधील गटार अंडरग्राउंड करण्यासाठी या भागातील सर्व युवक आक्रमक झाल्याचे दिसून आले, नगरपरिषदेच्या नगरसेवकांसह नगरपरिषदेला वारंवार सांगितले असूनही आजपर्यंत त्यांनी देखील या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. आणि इंदापूर नगरपालिका प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत आहे या भागातील गटार मोठी असल्यामुळे आणि त्यावरती गवत व इतर झाडांचे खुप मोठ्या प्रमाणावर साम्राज्य निर्माण झाल्याने ही गटार दिसून येत नाही आणि यामुळेच येणारे जाणारे नागरीक लहान मुले या गटांमध्ये पुढून जीवित हानी होण्याची शक्यता असल्यामुळे या ही गटार अंडरग्राउंड करावी लागणार आहे. यासाठी या भागातील युवक व नागरिक यांनी इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांच्या कडे निवेदन देऊन मागणी केली आहे .
जर इथून पुढे या गटांरीमध्ये पडून कोणाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील नागरिक करत आहे . नगरपालिकेने ही गटार येत्या आठ दिवसांमध्ये अंडरग्राउंड जर नाही केली तर या भागातील सर्व युवक व नागरिक तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाणार आहे. असे तेथील युवक स्वप्नील गदादे, सुरज शिंदे व इतर सहकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी स्वप्निल गदादे, सुरज शिंदे ,ऋषिकेश शिंदे, तुकाराम शिंदे, ओंकार शिंदे, अनिकेत शिंदे, शाहरुख मोमिन, महेश ढगे , आकाश पाटूळे, रोहित ठावरे व इतर युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.