
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी: गेल्या अनेक दिवांपासून देशातील प्राचिन वारसा जो आज पर्यंत कोणताही अभ्यासक त्याठिकाणी गेला नाही.अशा ठिकाणी संपूर्ण भारत देशात सुमारे(८४०००)हजार स्तूपांचा शोध घेत लेणी संवर्धन समितीची मोहीम म्हणजे आज पर्यंत न झालेला एक प्रामाणिक प्रयत्न होय. अशातच पुणे जिल्ह्यातून ८०० कि.मी. चा प्रवास करत मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरात पुणे जिल्ह्यातील लेणी संवर्धन समितीची मोहीम प्रवास करत दुर्लक्षित बौद्ध स्तूपाचा शोध घेत सुमारे एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पुणे जिल्ह्यात पोहोचली. त्या नंतर शोध मोहिमेदरम्यान आलेल्या आठवणी लेणी संवर्धन समितीचे समन्वयक मनोज गजभार व सागर कांबळे हे आपल्या असंख्य उपासकापर्येंत पोहोचण्यासाठी दैनिक चालु वार्ताशी केलेली बातचीत आपल्या वाचकांना देत आहोत… खरबई या गावातून साधारणपणे ३-४ कि.मी पायी प्रवास करत हि मोहीम अरण्यातून शोध घेत ज्या ठिकाणी हे स्तूप आहे त्या ठिकाणी पायी तुडवत हि मोहीम २० मिनिटांत डोंगरावर पोहचली. स्तूप शोधण्यासाठी मोठी झाडी पार गरणे गरजचे होते त्या मुळे हि मोहीम झाडी झुडपे बाजूला सारत येथील स्तूप शोधले. ज्या वेळेस स्तूप पाहिले त्या वेळेस कंठ भरून आल्याच्या आठवणी दैनिक चालु वार्ता शी बोलताना सांगितल्या. कारण आज पर्यंत आपण फक्त सांचीचा इतिहास वाचत आलो आहोत पण(८४०००)हजार स्तुपांचा शोध घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. अतिविशाल स्तूप मानवी हानीमुळे खंडित झाला होता. स्तुपाचे तुकडे संपूर्ण परिसरात पडले होते. हा भव्य असा स्तूप प्राचिन काळी लाखों बौद्ध भिक्खू,उपासक ज्या स्तूपाला वंदन करत होते तो आज शेवटची घटका मोजतना या मोहिमेने पाहिले. या ठिकाणी दोन बौद्ध स्तूप आहे. दुसरा स्तूप आकाराने थोडा लहान पण मोठ्या स्तूपापेक्षा रचना काही अंश शिल्लक होती. हे स्तूप साधारपणे इसवी पूर्व २-१ पहिल्या शतकातील असल्याचा अंदाज शोध मोहीमेने वर्तवला. सोबतच या स्तूपमध्ये देखील शरीर धातू होते. या स्तूपाच्या मधोमध खोदकाम झाले होते आणि आतील वस्तू बाहेर काढण्यात आल्या होत्या. मानव हा लालसेपोटी आपला अमूल्य वारसा स्वतः नष्ट करत आहे याचा हा सबळ पुरावा. या स्तुपात जे शरीर धातू ठेवले जात होते ते एका दगडी पेटी मध्ये करांडत ठेवले जात होते. त्यात शरीर धातू, बोधिवृषाची फांदी, सोन्याची फुले, हिरे, माणिक, मोती इत्यादी वस्तूंची ठेवण केली जात होती. शोध मोहीमेने तब्बल २ तासा पेक्षा जास्त स्तुपाची पाहणी केली . स्तूप पाहून झाल्यानंतर पुढे आणखीन स्तूप शोधण्यासाठी या मोहिमेने पुढचा प्रवास सुरू केला. पुढे काही नैसर्गिक लेण्या आढळल्या त्यात अतिप्राचीन शैल्य चित्र पाहायला मिळाली. पुढे तेथील शिव मंदिर पाहण्यासाठी लेणी संवर्धन मोहीम गेली. हे मंदिर म्हणजे एक नैसर्गिक लेणीच होय पण ही लेणी पाहून आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याचं कारण देखील तसेच आहे. सुरवातीला काही शैव मुर्त्या आणि शिवलिंग पाहायला मिळते. पण मात्र येथील भिंतींवर जे काही कोरले होते ते संपूर्ण भारतात आधुनिक पद्धतीने कोणीच कोरले नसावे.असा अंदाज या मोहिमेने व्यक्त केला. महाकाय शिलालेख त्या शिलालेखात आपल्या देशाचा उल्लेख जम्बुद्वीप म्हणून केला होता. एवढंच नव्हे तर चक्रवती सम्राट अशोक यांच्या जीवनाचे वर्णन त्यासोबतच गुजरात राज्यातील जुनागढ येथील गिरनार येथील १० व्या शिलेलखाचे वर्णन केले होते. १५-२०फुटाची भिंत अक्षरशः शिलालेखांत भरलेली पाहिली. भारत देशाची राज मुद्रा, संयुक्त राष्ट्राचे चिन्ह, सुमेध बोधिसत्व कोरीव शिल्प, संस्कृत मधील बुद्धांचे काही सुत्त ह्या कधी पाहिलेल्या गोष्टी कोरीव स्वरूपात पहिल्यांदा पाहिले. हे सर्व पाहून झाल्यावर या मोहिमेने परतीचा प्रवास केला.