
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
फलटण ता.मौजे साखरवाडी गावच्या हद्दीत चंदाबाई बाळू जाधव हे गांजा विक्री करत असल्यांची गोपनीय माहिती नुकत्यांच नव्यांने रुजू झालेल्या फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आणि साखरवाडी दूरक्षेत्रांच्या पोलीस उपनिरीक्षक सौ. स्वाती घोंगडे यांना मिळाली स्वाती घोंगडे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना समवेत सदर ठिकाणी जावुन माहिती घेत आंबेडकरनगर साखरवाडी गावच्या हद्दीमध्ये चंदाबाई बाळू जाधव ही तिच्या राहत्या घरी पत्र्यांच्या शेडच्या आडोशालगत बेकायदेशीर चोरटी गांजाची विक्री करत असल्यांने तिच्या हालचालीवरुन दोन पंच असे चंदाबाई बाळू जाधव यांच्या घराजवळ गेल्यानंतर तिच्या हालचालीवरुन पोलिसांनी तिला ताब्यांत घेतले व तिच्या कब्जांतील पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण ६१.५००/रुपये किमतीचा गांजा आढळून आला तिच्या विरोधांत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांत गु.र नं५१०/२०२२ गुंगीकार औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एन डी पी एस) अधिनियम १९८५ कलम २०( बं) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आला. गपचूप चालणारा गांजा विक्रीचा धंद्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती घोंगडे यांनी तसेच पथकांने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यापासून १२ वर्षातील आजपर्यंतची गांजा विक्री बाबतची ही सर्वात मोठी कारवाई केल्याने साखरवाडी परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे चांगलेच कौतुक केले. सदर कारवाईमुळे आता अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल,अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरवाडी दूरक्षेत्रांचे महिला पोलीस उपनिरीक्षक सौ.स्वाती घोंगडे यांच्यासह रुपाली भिसे, सहा.पोलीस फौजदार विलास यादव मोहन हांगे, निखिल गायकवाड,आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.