
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
कलंबर सर्कल मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी जिल्हा परिषद निवडणूक सर्व शक्तीनिशी लढविणार अशी माहिती कलंबर सर्कल मधील इच्छुक उमेदवार विलास पाटील घोंरबांड यांनी दिली.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात सदा अग्रेसर
असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विलास पाटील घोरबांड (कलंबरकर) यांनी कलंबर,हाडोळी,गोलेगाव ,किरोडा,दगडसांगवी,मजरेसांगवी, पोलेवाडी, खेडकरवाडी,पोखरभोसी ,पोखरी,निळा कलंबर आदी गावात दौरा चालू असुन कलंबर सर्कल मधुन या अगोदर अनेकजण बाहेरुन आले व निवडून गेले नंतर जिल्हा परिषद उपाध्यक्षा सहित आमदार, खासदार झाले पण त्यांनी कलंबर सर्कल चा अद्याप पर्यंत विकास केला नसुन स्वतः चाच विकास केला असे विलास पाटील घोंरबांड यांनी सांगितले तसेच त्यांनी सांगितले की कलंबर सर्कल मधील मतदार बंधु भगिनींनी निवडूण दिल्यास येणाऱ्या काळात विकास कामाचा अनुशेष भरून काढणार रस्ते पाणी वीज आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणार व निवडणूकीची जोरदार तयारी केली असल्याची माहिती विलास पाटील घोरबांड यांनी दिली.